मग ह्या पापाचे धनी तुम्ही होणार का ? : उद्धव ठाकरे

मग ह्या पापाचे धनी तुम्ही होणार का ? : उद्धव ठाकरे

मुंबई : अवनी वाघिणीची शिकार करण्यात आली त्या नंतर आता ही शिकार नियमानुसार केली गेली का नाही या साठी जी चौकशी कमिटी नेमली आहे तो एक फार्स आहे असून, ज्या लोकांनी अवनीच्या शिकारीची सुपारी दिली त्यांनाच या कमिटीवर नेमण्यात आले आहे असल्याची टीका करतानाच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांची कमिटी नेमूण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी काही वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्री यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली मग सर्जिकल स्ट्राईक काय मोदींनी केला होता का मग त्याच श्रेय कसं घेतलं. मग ह्या पापाचे धनी तुम्ही होणार का या शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाडा विदर्भ भागातील शेतकरी कुटुंबाची या दुष्काळामुळे दयनीय अवस्था आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाच्या झळा शेतकरी कुटुंबाना बसत आहेत. अशा दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या ५ हजार शेतकरी कुटुंबाना शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. अमरावती, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, जालना, बीड , लातूर, वाशीम, नांदेड, उस्मानाबाद, आणि यवतमाळ येथील शेतकरी कुटुंबाना १५ किलो गहू आणि तांदूळ, ५ लिटर गोडेतेल, ५ किलो साखर, ३ किलो डाळ, २ किलो रवा आणि मैदा, ३ किलो डालडा, उटणं आणि साबण अश्या दिवाळी आणि ग्रुहपयोगी वस्तू आज पाठवण्यात आल्या आहेत.

Previous articleवाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती गठीत
Next articleवनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा : निरूपम