राम मंदिरासाठी संघ दक्ष २५ नोव्हेंबरला हुंकार रॅली
नागपूर:राम मंदिराकरता रा. स्व. संघाने आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर रेशीम बागेत आज बैठक झाली. मंदिर आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणून येत्या २५ नोव्हेंबरला हुंकार रॅली काढण्याचे ठरले. या बैठकीला पाचशे स्वयंसेवक बैठकीला उपस्थित होते.
पहिली हुंकार रॅली संघाच्याच भूमीत म्हणजे नागपुरात होत आहे. २५ नोव्हेंबरलाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे अयोध्येतून मंदिराकरता रणशिंग फुंकणार आहेत. हे उल्लेखनीय ,संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत संघाने मंदिरासाठी आंदोलन पुकारावे लागेल, अशी घोषणा केली होती. त्यानुसारच संघाचा आज निर्णय झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. संघ आणि शिवसेना यांच्यात आता शह काटशहाचे राजकारण सुरु झाले आहे.संघाच्या पहिल्या रॅलीसाठी लाखो लोक येतील, असा अंदाज आहे. साध्वी ऋतंभरा याही मार्गदर्शन करणार आहेत.