संजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार :मुनगंटीवार
चंद्रपूर:मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अवनी वाघिणीच्या मृत्युवरुन वनमंत्री मुनगंटीवार यांना लक्ष्य केले आहे. मुनगंटीवार हे वाघांची हत्या करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप निरुपम यांनी केला. त्यास उत्तर देताना मुनगंटीवार यांनी अवनीच्या आडून खोटे आरोप थांबवावेत असे सांगत, संजय निरुपम यांच्यावर आपण चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, असा पलटवार केला.
मुनगंटीवार म्हणाले की, मृत वाघिणीच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार होत आहे. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. निरुपम यांच्याकडून वेगळी अपेक्षा करता येणार नाही. वनमंत्री म्हणून माझ्या कारकीर्दीत फक्त एका वाघिणीची बंदुकीच्या गोळीने मृत्यु झाला. बाकीच्या वाघांचा मृत्यु नैसर्गिक कारणांनी झाल्याचे ते म्हणाले.