उद्घव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमू : मुनगंटीवार

उद्घव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमू : मुनगंटीवार

चंद्रपूर: अवनी वाघिणीच्या संशयास्पद मृत्युने राजकीय धुरळा अजून उडतोच आहे. वाघिणीच्या हत्येप्रकरणी नेमलेली चौकशी समिती फार्स आहे, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांनी केल्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी तिखट उत्तर दिले आहे. वाघिणीच्या मृत्युची चौकशी समिती आम्ही उद्घव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमू शकतो, असे मुनगंटीवार म्हणाले.

उद्घव ठाकरे हे युतीमधील महत्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी स्वीकारले नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून चौकशी करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केलीच आहे, असे ते म्हणाले.यात अकारण हीन दर्जाचे राजकारण केले जात असल्याची खंत मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

अवनी वाघिणीच्या मृत्यु प्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती हा निव्वळ फार्स आहे. त्यात काही अर्थ नाही, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली होती. मुख्यमंत्री म्हणतात की, वनमंत्री मुनगंटीवार यांनी स्वत: बंदूक हातात घेऊन अवनीला मारले नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: बंदूक घेऊन सर्जिकल स्ट्राईक केला का, असा टोला लगावला. ज्यांच्यावर अवनीच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे तेच या चौकशी समितीत आहेत, असे ते म्हणाले. अवनीच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Previous articleसंजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार :मुनगंटीवार
Next articleगोपीनाथ मुंडे आणि मी बंद खोलीत चर्चा करताना चंद्रकांत पाटील बाहेर उभे असायचे : शेट्टी