गोपीनाथ मुंडे आणि मी बंद खोलीत चर्चा करताना चंद्रकांत पाटील बाहेर उभे असायचे : शेट्टी
उस्मानाबाद:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात ऊस दरावरुन चांगलीच जुंपली आहे. शेट्टी यांनी आज पाटील यांच्यावर तिखट टीका करताना सांगितले की, गोपीनाथ मुंडे आणि मी बंद खोलीत चर्चा करत असताना चंद्रकांत पाटील दरवाज्यावर उभे असायचे. त्यांना आजही याची खंत वाटत असावी. आता चंद्रकांत दादा शेट्टी यांना तितकेच जोरदार उत्तर देतात का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऊस दर आंदोलना दरम्यान पाटीलशआणि शेट्टी यांच्यात जोरदार जुंपली आहे.शेट्टी यांनी आज उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांंच्यावर झोंबणारी टीका केली. मी आणि गोपीनाथ मुंडे महाआघाडीबाबत बंद खोलीत चर्चा करत असताना पाटील बाहेर दरवाज्यावर थांबलेले असायचे. महाआघाडीचा निर्णय झाला तेव्हाही चंद्रकांत पाटील कुठेशहोते हे त्यांनाच विचारा, असे राजू शेट्टी म्हणाले.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल शेट्टी म्हणाले की, वस्ताद सर्वच डावपेच पैलवानाला शिकवत नाही. कोण कुठे गेले याची मला फिकीर नाही. डाव शिकायलाही बुद्धी लागते, असा टोला त्यांनी खोत यांना लगावला. ऊस दर आंदोलन चिरडून टाकण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.