मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर पंकजा मुंडे उद्यापासून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधणार
परळी : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे हया उद्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड दौ-यानंतर सायंकाळी लगेचच परळी मतदारसंघातील गावांचा दौरा करणार आहेत. या दौ-यात त्या दुष्काळग्रस्तांशी संवाद साधण्याबरोबरच विकास कामांचाही आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे सोमवारी १२ तारखेला बीडच्या दुष्काळी दौ-यावर येणार आहेत. या अगोदर गेल्या महिन्यात पंकजा मुंडे यांनी परळी, अंबाजोगाई, धारूर व केज तालुक्याचा दौरा करून दुष्काळाची पाहणी केली होती व तसा अहवाल सरकारला सादर केला होता. उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांसोबतचा दौरा आटोपल्यानंतर पंकजा मुंडे हया सायंकाळी ५.३० वा. परळी तालुक्यातील पौळ पिंपरी, ६.३० वा. कौडगांव साबळा, ७.३० वा. गाढे पिंपळगांव आणि रात्रौ ८.३० वा. बेलंबा येथे जाणार आहेत. याठिकाणी जनतेशी संवाद साधून विकास कामांचा आढावा त्या घेणार आहेत. मंगळवारी १३ नोव्हेंबर रोजी त्या दिवसभर परळी शहरात असणार असून सकाळी १० वा. (बेलवाडी) येथे लिंगायत समाज स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. १४ तारखेला सायं. ५.३० वा. राडी सर्कलमधील अकोला, ६.३० वा. धानोरा व रात्रौ ८ वा. राडी येथे त्या जाणार आहेत. १५ तारखेला त्या शहरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
या दौ-यात भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोक प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, गणेश कराड, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया आदींनी केले आहे.