उद्धव ठाकरेंनी आधी बाळासाहेबांच्या स्मारकाकडे लक्ष द्यावे

उद्धव ठाकरेंनी आधी बाळासाहेबांच्या स्मारकाकडे लक्ष द्यावे
विश्व हिंदू परिषद

मुंबई:शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील रॅलीवर विश्व हिंदू परिषदेने जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अगोदर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकडे लक्ष द्यावे, असा टोला विहिंपचे अध्यक्ष विष्णु कोकजे यांनी लगावला.

एका कार्यक्रमानिमित्त आले असताना ते म्हणाले की, २५ नोव्हेंबरला शिवसेना अयोध्येत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करणार आहे. परंतु इतक्या वर्षांनंतर आताच हा मुद्दा शिवसेनेला कसा आठवला, हा प्रश्न मला पडला आहे. शिवसेनेची उत्तरेत ताकदच किती आहे? इकडे उत्तर भारतीयांना झोडपायचे आणि तिकडे अयोध्येत परप्रांतियांच्या विरोधावर प्रश्न विचारले तर ठाकरे काय उत्तरे देणार आहेत, असा सवाल कोकजे यांनी केला.

शिवसेना राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करत आहे. पण तेवढी त्यांची ताकदच नाही. शिवसेनेने अगोदर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकडे लक्ष द्यावे, नंतर अयोध्येकडे पहावे, असा टोला कोकजे यांनी लगावला. पत्रकार परिषदा घेऊन राम मंदिर बनत नसते.केंद्र सरकारने मंदिराबाबत अध्यादेश काढण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालयाच्या निकालासाठी किती वाट पहायची, असे ते म्हणाले.

Previous articleआत्महत्या नाही, ही तर सरकारी हत्या: खा.चव्हाण
Next articleअवनी वाघिणीला जेरबंद न करता मारण्याचा  निर्णय पूर्णतः असमर्थनीय : निरुपम