आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढील प्रमाणे आहेत.

१. सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पात्र लाभधारकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासह शासकीय तसेच गायरान जमिनी तातडीने देण्यासाठी धोरणात्मक निर्णय.

२. काम करण्यास सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवासमाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याचा निर्णय.

३. मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्याचा निर्णय.

४. पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी (ता. वेल्हे) देण्यात आलेल्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा.

Previous articleवाघिण हत्येवरुन कॉंग्रेसमधील मतभेद उघड
Next articleसमृद्घी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी