समृद्घी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी
मुंबई: मुंबई ते नागपूर या दरम्यान प्रस्तावित समृद्घी महामार्गाला शिवसेनेने अगोदर कडवा विरोध केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर भाजपवर घणाघाती टीका केली होती. परंतु आता त्याच महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेनेने समृद्घी महामार्गाला प्रचंड विरोध केला. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाचे अध्यक्षपद स्वीकारले. आता तर या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे.आधी कडवा विरोध आणि नंतर बाळासाहेबांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दहा जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर अंतर कापण्यास अर्धाच वेळ लागणार आहे.