येत्या निवडणूकीत महाराष्ट्र युती सरकारची शिकार करेल : राज ठाकरे

येत्या निवडणूकीत महाराष्ट्र युती सरकारची शिकार करेल : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रातून अवनी वाघिणीच्या शिकारीच्या मुद्या उपस्थित करीत राज्य सरकारला फटकारले आहे. आगामी निवडणूकीत महाराष्ट्र भाजप सरकारची शिकार करेल असे या व्यंगचित्रातून दर्शवले आहे.

राज्यात अवनी वाघिणीच्या शिकारीचा मुद्दा चांलाच गाजत असून, वन्यजीव प्रेमींसह विरोधी पक्षांनी अवनी मुद्यावरुन राज्य सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य करीत  वनमंत्री मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची  मागणी केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचाच हाच धागा पकडत आगामी निवडणूकीत  राज्य सरकारची स्थिती कशी असेल हे आजच्या व्यंगचित्रातून मांडले आहे. या व्यंगचित्रात एका बाजूला मुख्यमंत्री आणि वनमंत्री अवनी वाघिणीची शिकार करताना तर दुस-या बाजूला अवनी वाघिण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची शिकार करताना दाखवले आहे.

Previous articleऔरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याची नावे बदला
Next article… मग शेतकऱ्यांबाबतच शिवसेनेला मंत्रिमंडळात कंठ का फुटत नाही? : विखे