साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?

साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करणारी बोचरी व्यंगचित्रं सातत्यानं प्रसिद्ध केल्यावर आता भाजपनंही राज यांना जशास तसे उत्तर दिलं आहे. राज यांच्यावरील कार्टून भाजपनं जारी केलं असून त्यात राज हे कोणतीही निवडणूक आली आणि त्यात मनसेला एकही जागा मिळाली नाही तरी कार्टूनच काढत बसतात, असा टोला भाजपनं लगावला आहे.

भाजपनं राज यांची जोरदार खिल्ली कार्टूनच्या माध्यमातूनच उडवली आहे. राज ठाकरे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या तरीही कार्टूनच काढत बसले आहेत, असा टोला भाजपने हाणला आहे. मनसे कार्यकर्ते ‘साहेब, लोकसभा निवडणूक आली,’ ‘ साहेब, विधानसभा निवडणूक आली’, ‘साहेब, आपली एकही जागा आली नाही’, असं कार्यकर्ते राज यांना सांगत आहेत. दरवेळेस राज ठाकरे कार्टून काढण्यातच मग्न आहेत, असं मार्मिक टोला लगावणारं व्यंगचित्र भाजपनं प्रसिद्ध केलं आहे. राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांकडे पहातही नाहीत. केवळ इतरांची कार्टून काढून जागा जिंकता येत नाहीत, असं भाजपला यातून सुचवायचं आहे.

Previous articleराज्यातील पालिकांची जमीन बेघरांसाठी उपलब्ध होणार
Next articleआमदार अनिल गोटे यांनी घेतला राजकीय संन्यास