आमदार अनिल गोटे यांनी घेतला राजकीय संन्यास

आमदार अनिल गोटे यांनी घेतला राजकीय संन्यास

भाजपला जोरदार धक्का

धुळे:काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेले आमदार अनिल गोटे यांनी आज राजकीय संन्यास घेत असल्याचीच घोषणा करुन टाकली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गोटे यांनी ही घोषणा करताना भाजपमध्ये गुन्हेगारांना प्रवेश दिला जात असल्याने नाराज होऊन हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. गोटे यांनी १९ नोव्हेंबरला राजीनामा देणार असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे. गोटे हेशधुळे भाजपमधील महत्वाचे नेते असल्याने त्यांच्या या संन्यासाच्या घोषणेने भाजपला धक्का बसल्याचे मानले जाते.
गोटे यांनी यापूर्वीही पक्षातील नाराजी बोलून दाखवली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत गोटे यांना बोलू दिले नव्हते तसेच धक्काबुक्की करण्यात आली होती. पालकमंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्यावर गोटे यांनी अनेक गंभीर आरोप केले होते.

Previous articleसाहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?
Next articleउद्धव ठाकरेंची हिंदीची शिकवणी सुरु