उद्धव ठाकरेंची हिंदीची शिकवणी सुरु

उद्धव ठाकरेंची हिंदीची शिकवणी सुरु

मुंबई:अयोध्येत २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाऊन राम मंदिर प्रश्नावर उत्तर भारतीयांना संबोधित करणार आहेत. यासाठी त्यांनी आता हिंदी भाषेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे. हिंदी भाषेचा लहेजा पकडण्यास आणि भाषेचे बारकावे समजून घेण्यासाठी त्यांनी तज्ञांकडून धडे घेणे सुरु केले आहे.

कायम मराठीच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या ठाकरे यांनी आता हिंदीतून भाषण करण्याची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेकडे उत्तर भारतीयांची मते वळवण्यासाठी त्यांचा अयोध्येतील सभेचा निर्णय असल्याचे बोलले जाते.
राम मंदिर उभारणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा आहे. अयोध्येत त्यांची जाहीर सभा होत असून एक तास त्यांचे भाषण चालेल, अशी माहिती मिळते आहे. शिवसेनेच्या या सभेला उत्तर भारतीयांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण हिंदीतून भाषण करण्याची उद्घव ठाकरे यांची ही पहिलीच वेळ आहे.

Previous articleआमदार अनिल गोटे यांनी घेतला राजकीय संन्यास
Next articleशिवसेनेशी युती होणारच ! रावसाहेब दानवे यांचा दावा