येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देणार : मुख्यमंत्री

येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देणार : मुख्यमंत्री

शनिशिंगणापूर : राज्य मागासवर्ग आयोगाने आज आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोठा खुलासा केला आहे.येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ असे सांगतानाच मराठा समाजाने येत्या १ डिसेंबरला  जल्लोष करावा” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बोलताना दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यालेळी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला  धक्का लागणार नाही असेही त्यांनी स्पष्ट करून  मराठा समाजाने जल्लोषासाठी तयार राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous articleमागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर
Next articleगुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढण्याची कॅांग्रेसची मागणी