यंदा विलास मुत्तेमवारांचा पत्ता कट ?

यंदा विलास मुत्तेमवारांचा पत्ता कट ?

नागपूर: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या नेतृत्वाखाली प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीत बदल केले आहेत. यामुळे सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले विलास मुत्तेमवार यांना पक्ष यंदा मात्र संधी देणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात कॉंग्रेस कुणाला उतरवते, याची उत्सुकता आहे.

माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, बबनराव तायवाडे, प्रफुल गुडधे यांच्या नावांची चर्चा आहे. शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनाही उमेदवारी मिळू शकते. मुत्तेमवार म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. मुत्तेमवार यांच्या यशाची खरी ताकद ठाकरे हेच होते. परंतु कॉंग्रेसने केलेल्या प्राथमिक चाचपणीत मुत्तेमवारांचे नाव कट झाले हा त्यांना धक्का आहेच. परंतु ठाकरेंचं नाव यावं हा त्याहून मोठा धक्का आहे.विजय वडेट्टीवार निरीक्षक असून ते संभाव्य उमेदवारांची नावं समोर ठेवतील. पण मुत्तेमवार यांच्याप्रमाणेच आशिष देशमुख, नितीन राऊत आणि नाना पटोले हेही कार्यकर्त्यांना नको आहेत.परंतु दिग्गजांची मतंही विचारात घेतली जाणार असल्याने या प्राथमिक चाचपणीला फारसे महत्व देत नसल्याचे मुत्तेमवार यांनी सांगितले. निरीक्षकांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर या चार नावांना पसंती असल्याचे समोर आले.

Previous articleअशोक चव्हाण लोकसभा ऐवजी विधानसभा लढवणार ?
Next articleसरकारला कधी जाग येणार? : सुप्रिया सुळे