अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आरक्षण जाहिर करा : मुंडे
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागास आयोगाने सरकारला दिलेल्या अहवालात सकारात्मक शिफारस असेल, तर अतिशय आनंद आहे. सरकारने तातडीने कॅबिनेट समोर हा अहवाल ठेवुन तो स्वीकारावा व हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अस्तित्वातील आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण जाहिर करावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणा बाबत राज्य मागास आयोगाने आज सरकारला अहवाल दिला, त्यावर प्रतिक्रीया देताना मुंडे म्हणाले की, राज्य मागास आयोगाने मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेल्या अहवालात सकारात्मक शिफारस असल्याचे माध्यमांच्या बातम्यांमधुन समजते, असे असेल तर ती आनंदाची गोष्ट असून, आता अधिक विलंब न करता कॅबिनेटने हा अहवाल स्वीकारावा व हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अस्तित्वातील आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण जाहिर करावे.