गृहनिर्माण वसाहत स्वच्छता चषक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवारी
मुंबई : भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मागाठणे विधानसभा क्षेत्रात राबविण्यात आलेल्या गृहनिर्माण वसाहत स्वच्छता चषक स्पर्धे’चा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवार १६ नोव्हेंबर रोजी राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते होणार आहे.
भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मागाठाणे विधानसभा क्षेत्रात राबविलेल्या स्वच्छता अभियानद्वारा घेतलेल्या ‘गृहनिर्माण वसाहत स्वच्छता चषक स्पर्धे’चा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ठाकुर बँक्वेट हॉल, ठाकुर सिनेमा लगत, ठाकुर व्हिलेज, कांदिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता व खासदार गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
भाजपा आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमास आमदार अतुल भातखळकर, आमदार मनिषा चौधरी, माजी आमदार रमेशसिंह ठाकुर, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गृहनिर्माण वसाहत स्वच्छता स्पर्धेत मागाठाणे विधानसभा क्षेत्रातून ३०० गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घेतला होता. यापैकी वॉर्ड निहाय प्रत्येकी ३ असे २१ स्वच्छता चषक व रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच या स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या गृहनिर्माण संस्थेला सन्मानचिन्ह देऊन सन्मानितही करण्यात येणार आहे.