मुंबईत स्थायिक माणसाने गावाकडच्या दुष्काळाची जाण ठेवावी: मुंडे

मुंबईत स्थायिक माणसाने गावाकडच्या दुष्काळाची जाण ठेवावी: मुंडे

काशीमीरा (मिरा भाईंदरच्या) अखंड हरिनाम सप्ताहास दिली भेट

मुंबई : राज्यात 1972 पेक्षाही भिषण दुष्काळ आहे, मुंबईतील माणसांना या दुष्काळाची तिव्रता जाणवत नसली तरी गावाकडुन येऊन मुंबईत स्थायिक झालेल्या माणसाने गावाकडील दुष्काळाची जाणीव ठेवुन गावासाठी काय करता येईल याचा विचार करावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मिरा भाईंदर भागातील काशीमिरा या गावात श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्था व काशीमिरा ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित पंधराव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सभारंभास त्यांनी आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबोले, आयुक्त बालाजी खतगांवकर, पोर्णिमाताई काटकर, भाऊसाहेब खरपाटे, सुभाष काशिद, अविनाश नाईकवाडे, संतोष काशिद, संतोष गोले आदी उपस्थित होते.

या भागात बीड जिल्ह्यातील बहुंताश नागरीक राहत असल्याने आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद आणि समाधान आज लाभले आहे. नारायगडावर माझी अखंड श्रध्दा आहे, त्यामुळेच आज मी आशिर्वाद घेण्यासाठी आवर्जुन इथे उपस्थित राहिलो आहे. या भागात वारकरी भवन बांधण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत या भागातील जनतेने आपल्या गावासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले केले.

Previous articleगृहनिर्माण वसाहत स्वच्छता चषक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवारी
Next articleधनगर समाजाला आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन: प्रकाश शेंडगे