जाणत्या राजाने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, ते आम्ही देतोय : विनोद तावडे

जाणत्या राजाने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, ते आम्ही देतोय : विनोद तावडे

ठाणे:जे स्वत:ला मराठ्यांचे जाणते राजे म्हणवून घेत होते त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. ते आरक्षण आम्ही देणार आहोत, असा टोला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.

ठाण्यातील शाळांच्या ग्रंथपालांच्या एका कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधला. यापूर्वी आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. पण ते न्यायालयात टिकले नाही. आम्ही मागासवर्गीय आयोगामार्फत न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार आहोत, असे तावडे यांनी स्पष्ट केले. हे आरक्षण कायमस्वरुपी असेल. आता आरक्षण कायम टिकणारे हवे की तात्पुरते याचा निर्णय मराठा समाजाने घ्यावा, असेही तावडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळल्याचे तावडे म्हणाले. तावडे यांनी पवारांवर नाव न घेता केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याची उत्सुकता आहे.

Previous articleउपसमितीमध्ये राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश
Next articleआर. आर. आबांच्या स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेल : सुधीर मुगंटीवार