शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन  

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन
 
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ६व्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत,जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार चंद्रकांत खैरे,अरविंद सावंत, रवींद्र गायकवाड, विनायक राऊत,खासदार पूनम महाजन, आमदार भाई गिरकर,भरतशेठ गोगावले, आमदार तृप्ती सावंत, नीलम गोऱ्हे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleराज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा?: विखे पाटील  
Next articleलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्जः खा. अशोक चव्हाण