न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या : शिवसेना

न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या : शिवसेना

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज विधानभवन परिसरात शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले. पुढच्या काळात शांतता हवी असेल तर मराठा समाजाला तातडीने न्यायालयात टिकेल असे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या अशी मागणी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन केले. राजेश क्षीरसागर,सुजित मिनचेकर,,चंद्रदिप नरके,,सत्यजित पाटील,प्रकाश अंबिटकर यांनी या मागणीसाठी घोषणा देत आंदोलनात सहभाग घेतला. मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले पण आरक्षण मिळाले नाही.न्यायालयाचे आणि मागासवर्ग आयोगाचे कारण देत मराठा समाजाचा फुटबाॅल करत आहेत.पुढच्या काळात मराठा समाज शांत ठेवायचा असेल तर कायद्याने आणि न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याची मागणी आ. राजेश क्षीरसागर यांनी केली.

Previous articleपटेलांसाठी भाजपने युगपुरुष शिवरायांना खुजे ठरवले : उद्धव ठाकरे
Next articleवा रे फडणवीस तेरा खेल…सस्ती दारु महंगा तेल…