अखेर भाजप आमदार अनिल गोटे नरमले !

अखेर भाजप आमदार अनिल गोटे नरमले !

मुंबई :  हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा करणिरे धुळ्याचे भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दोन अटींवर राजीनामा मागे घेतल्याची कबुली त्यांनी दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित धुळ्यात पक्षाच्या विरोधात उघड उघड भूमिका घेत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा आ. गोटेंनी केली होती.भाजपात गुंडांना प्रवेश दिल्याच्या कारणास्तव गोटेंनी नाराजी व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिले जात असल्याबाबतही त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. आपण धुळ्याच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

आ. गोटे आज आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा विधानभवन परिसरात होती. आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमुळे आपण निर्णय बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारांना भाजपात प्रवेश देणार नाही , धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका या आ. गोटेंच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील, या अटी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असल्याचे त्यांनी सांगत , यामध्ये दगाफटका झाल्यास पुन्हा आक्रमक होईल असा इशाराही त्यांनी दिला.

Previous articleवा रे फडणवीस तेरा खेल…सस्ती दारु महंगा तेल…
Next articleतब्बल २० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर