तब्बल २० हजार ३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने विधिमंडळात तब्बल २० हजार ३२६ कोंटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी २२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुरवणी मागणी मध्ये आगामी लोकसभा निवडणूकीसाठी २६ कोटी तर लोकसभा आणि विधानसभा एकत्रित निवडणुकीच्या चाचपणीसाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
राज्य सरकारने राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने शेतक-यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २२०० कोटी रूपये तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ३०० कोटी रूपयांची मिळून २५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.आगामी लोकसभा निवडणूकीच्या खर्चासाठी २६ कोटी तर एकत्रित निवडणूकांच्या चाचपणीसाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत २० हजार ३२६ .४५ कोटी रुपयांची पुरवण्या मागण्या सादर केल्या. शेतकरी व यंत्रमागधारकांना वीज बीलातील सवलतीसाठी सरकारने २००० कोटींची तरतूद केली आहे.
आजपर्यंतचा राज्य विधिमंडळातील पुरवण्या मागण्या मांडण्याचा विक्रम राज्यातील युती सरकारने मोडला असल्याची टीका विधानपरिषदेचेविरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी करीत आपले सरकार कसे कर्जात गेले आहे ते दाखवले आहे.आर्किकदृष्ट्या राज्याची स्थिती काय आहे हे राज्य सरकारने स्पष्ट केले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.