तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात नियोजन सहसचिवपदी बदली

तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात नियोजन सहसचिवपदी बदली

नाशिक:सर्व राजकीय पक्षांच्या रोषाचे धनी ठरलेले नाशिकचे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली आता थेट मंत्रालयात करण्यात आली आहे. नियोजन सहसचिव म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याकडे पदभार सोपवून तातडीने मंत्रालयात हजर होण्याचे आदेश मंत्रालयाने पाठवले आहेत.

मुंढे यांची कारकीर्द बदल्यांमुळेच गाजत राहिली असून सत्ताधाऱ्यांशी पंगा घेणारे म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. सत्ताधाऱ्यांच्या बेकायदा कामांना ते नेहमीच विरोध करतात आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांना धडा शिकवणारे अशी त्यांची प्रतिमा आहे. यामुळे त्यांची अनेकदा बदली झाली आहे.
नाशिक पालिकेत आयुक्त म्हणून बदली झाल्यावरही सत्ताधारी भाजपशी लवकरच त्यांचे बिनसले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नगरसेवकांशी बिनसल्यामुळे मुंढे यांना नवी मुंबई पालिकेतून पीएमटीत पाठवले होते. तेथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे मुंढे यांना महाग पडले. मुंढे यांना नागरिकांचा मात्र नेहमीच पाठिंबा राहिला आहे. सत्ताधारी नगरसेवकांना मात्र ते नको असतात.

Previous articleदोन्ही अहवाल सभागृहासमोर ठेवा तरच सभागृह चालू देवू : अजित पवार
Next articleकुंभकर्णासारखे झोपलेले सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी जागे होणार