आता हिंदू स्वस्थ बसणार नाही बोला मंदिर कधी उभारणार !

आता हिंदू स्वस्थ बसणार नाही बोला मंदिर कधी उभारणार !

अयोध्या : सरकारने संसदेत कायदा करुन राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करावा यासाठी शिवसेना केंद्र सरकारच्या पाठिशी उभी राहील, असे सांगतानाच आता हिंदू स्वस्थ बसणार नाही. मंदिर कधी उभारणार, हा प्रश्न तो विचारणारच अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला ठणकावले आहे.

अयोध्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नावरून  मोदी सरकारला लक्ष्य केले.श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नसल्याने राम मंदिरासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहू नका, असे विधान त्यांनी यावेळी केले. राम मंदिरासाठी ‘हिंदूंनी आणखी किती काळ  वाट पाहायची. आता हिंदू मार खाणार नाही, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. त्याचप्रमाणे आता हिंदू स्वस्थ बसणार नाही. मंदिर कधी उभारणार, हा प्रश्न तो विचारणारच,’ अशा शब्दांमध्ये  मोदी सरकारला ठणकावत, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मी येथे आलो आहे असेही ते म्हणाले.

मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नहीं बताएंगे,याचा संदर्भ देत, मला आज मंदिर उभारणीची तारीख हवी आहे.बोला, कधी उभारणार आहात राम मंदिर, असा सवाल ठाकरेंनी केला. संसदेत राम मंदिर उभारणीसाठी उभारणीसाठी कायदा करावा.यासाठी शिवसेना सरकारच्या बाजूने ठाम उभी राहील, असेही ठाकरे  म्हणाले.

Previous articleशिवसेना रामाच्या चरणी मंत्र्यांचे राजीनामे वाहणार का? :जयंत पाटील
Next article…तर सरकार बनणार नाही, पण मंदिर बनेल: उध्दव ठाकरे