‘ते’ २७९ शिक्षक आता होणार नाहीत कार्यमुक्त !

‘ते’ २७९ शिक्षक आता होणार नाहीत कार्यमुक्त !

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आदेश जाताच बीड जिल्हयातील ‘त्या’ २७९ शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून तसे आदेशच आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना निर्गमित करण्यात आले आहेत. दरम्यान, या आदेशामुळे शिक्षकांत आनंद व्यक्त होत आहे.

सदोष बिंदूनामावलीचा आधार घेत बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी २७९ शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्हयात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरूध्द शिक्षकांनी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्याकडे दाद मागितली होती. या निर्णयामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेवून पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागाचे सचिवांसोबत शिक्षक प्रतिनिधींची तातडीने बैठक घेवून बदली आदेशास स्थगिती दिली होती.

पंकजा मुंडे यांनी आदेश दिल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी आज मुख्य कार्यकारी अधिका-यांना लेखी पत्र पाठवून त्या २७९ शिक्षकांना बीड जिल्हा परिषेतून कार्यमुक्त करू नये असे स्पष्ट आदेशच दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून आणि शिक्षकां अभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी सध्या तरी या पदावर संबंधित शिक्षकांना कार्यरत ठेवण्यात यावे असेही त्यात नमुद करण्यात आले .

शिक्षक व विद्यार्थ्यांचा हित लक्षात घेवून  पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हयातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून शिक्षकांनी या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

Previous articleमराठा समाजाला  आरक्षण देणारच : मुख्यमंत्री
Next articleमराठा आरक्षण : भाजप आमदारांना व्हिप जारी