निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न : छगन भुजबळ

निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न : छगन भुजबळ

पुणे : सिंचन घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ माजी उपमौख्यमंत्री छगन भुजबळ हे अजित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सिंचन घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल एसीबीने काल प्रतिज्ञापत्र दाखल केले. या घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवारांची पाठराखण आहे.निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Previous articleचौकशीला सहकार्य करतोय आणि करत राहणार : अजित पवार
Next articleविरोधक आक्रमक झाल्यानेच सरकारकडून सूडबुद्धीचे राजकारण : मुंडे