असं काय आहे अहवालात की सरकारला धाकधुक वाटतेय !

असं काय आहे अहवालात की सरकारला धाकधुक वाटतेय !

 मुंबई : मराठा समजाला आरक्षण देताना त्यामध्ये किती टक्के आरक्षण देणार हे सरकार सांगत नाही. सरकार का असं करतंय सरकारला काही लपवायचं आहे का?आयोगाने दिलेल्या अहवालात काही अडचण आहे का? मागास आयोगाने दिलेल्या अहवालात असं काय आहे त्यामुळे सरकारला  धाकधुक वाटतेय. सरकार ठोस अशी भूमिका का मांडत नाही.असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात सरकारला केला.

 मराठा आरक्षणाबाबत आज सरकारकडून एटीआर आणि बिल मांडले जाणार आहे त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना अजितदादा पवार यांनी सरकारच्या अस्पष्ट भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.

 मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागास आयोगाने केलेल्या शिफारशी एटीआर पध्दतीने आज ठेवले जाणार आहे.उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज बिल जर ठेवलं तर बिलाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. त्याबद्दल काही अडचण नाही. परंतु बिल ठेवत असताना मागे जी काही अडचण निर्माण झाली होती. ते कोर्टात टिकले नाही. सरकारर अभ्यास करुन ठेवणार आहे. आता यांचा अभ्यास तर खूपच चालला आहे. अभ्यास करतच असताना आम्हालसुध्दा त्याबाबत थोडीफार माहिती आहे. आम्हीही विरोधी पक्षाचे आमदार त्याबद्दल थोडाफार अभ्यास करु असा टोला अजित पवार यांनी सरकारला लगावला.

 एटीआर मांडताना त्याबाबत असणारी उपसमिती आहे त्या समितीच्या गेल्या चार दिवसात सहा बैठका झाल्या आहेत. ठिक आहे अभ्यास करा. परंतु तुम्ही आम्हाला अंधारात ठेवताय…राज्याला अंधारात ठेवताय… त्या समाजाला अंधारात ठेवत आहात…नेमकं काय आहे असं…असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला केला.

 ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. धनगर समाजासाठी असलेला टीसचा अहवाल ठेवत नाही…मुस्लिम समाजाच्या काही मागण्या आहेत त्याला कुठे सरकार स्पर्श करत नाही. त्यामुळे सरकारने आज सेंकडलास्ट दिवस आहे उदया अधिवेशनाचा शेवट होणार आहे. याबद्दल सरकारने काहीतरी स्पष्ट सांगितले पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली.हे बिल यावं अशी आमची मागणी आहे. ते कोर्टामध्ये टिकावं आणि इतरांना कुठलाही त्रास होता कामा नये अशी आमची भूमिका आहे असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

 आज व्हॉटसअपवर काही काही फिरत आहे जल्लोष करा. जल्लोष करा त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे बॅनर लावा असे सांगितले जात आहे. आरक्षणासाठी ५८ मोर्चे निघाले. अनेक समाजाने पाठिंबा त्यांना दिला. ४० जणांनी आपला जीव गमावला आणि कसला जल्लोष करा सांगितले जाते.अरे आम्हीही १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला आणि ५ टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला दिले. त्यावेळी आम्ही जल्लोष नाही केला ती आमची जबाबदारी होती. ती जबाबदारी आम्ही पार पडली होती असे खडे बोल सरकारला सुनावतानाच यामध्येसुध्दा राजकारण केले जात आहे असा आरोपही पवार यांनी केला.

Previous articleअखेर श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई
Next articleमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण : कृती अहवाल सादर