मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण : कृती अहवाल सादर

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण : कृती अहवाल सादर

मुंबई : राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधिमंडळात  सादर करण्यात आला असून,त्यानंतर विधेयक मांडले जाणार आहे. या कृती अहवालासोबत विधेयकाची प्रतही सादर करण्यात आली आहे. विधेयकामध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे.

मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षण देण्यासाठी विधानमंडळात विधेयक  सादर केले जाणार  आहे. आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानमंडळात सादर करण्यात आला. या कृती अहवालासह विधेयकाची प्रतही सादर करण्यात आली आहे. कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर  मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक सादर केले जाणार आहे. अहवालात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद योग्य ठरेल, असे आज सादर करण्यात आलेल्या विधेयकात म्हटले आहे.

Previous articleअसं काय आहे अहवालात की सरकारला धाकधुक वाटतेय !
Next articleमराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर