धक्कादायक…. ७० टक्के मराठा कुटुंबे कच्च्या घरात राहतात
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील लोकसंख्येंच्या ३० टक्के मराठा समाज असून, सर्वेक्षणानुसार सुमारे ७० टक्के मराठा कुटुंबे हे कच्च्या घरात राहतात तर त्यापैकी ३७ टक्के मराठा कुटुंबे ही शेतातील तात्पुरत्या निवा-यात राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.मराठा समाजाच्या प्रमुकाच्या आत्महत्यांचे प्रमाण ही जिंताजनक बाब असल्याचे या अहवालावरून निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच वर्षात १३ हजार ३६८ व्यक्तींनी आत्महत्या केल्याची माहिती या अहवालातुन पुढे आली आहे.
मागासवर्ग आयोगाने राज्यभरात २१ ठिकाणी जनसुनावणी घेतली. त्यामध्ये १ लाख ९३ हजार ६५१ वैयक्तिक निवेदने,८१४ संस्थांची निवेदने प्राप्त झाली या मध्ये मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करण्यास पाठिंबा दर्शविण्यात आला. ८४ निवेदनकर्त्यांनी मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण देण्यास प्रखर विरोध केला होता.त्यानुसार आज सादर करण्यात आलेल्या मागासवर्ग अहवालातुन राज्यातील मराठा समाजाची आर्थिक सामाजिक बाब समोर आली आहे.या अहवालानुसार राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के हा मराठा समाज असून, ७६.८६ टक्के कुटुंब शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून आहेत.सर्वेक्षमानुसार ७० टक्के मराठा कुटुंबे कच्च्या घरात तर त्यापैकी ३७ टक्के कुटुंबे शेतातील तात्पुरत्या निवा-यात राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालातून सर्वात चिंताजनक बाब समोर आली असून, गेल्या पाच वर्षात मराठा समाजातील शेती व्यवसाय असणा-या १३ हजार ३६८ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत.अहवालानुसार गेल्या १० वर्षात ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे २१ टक्के मराठा समाजाने स्थलांतर केले आहे. स्थलांतरीत झालेले लोक प्रामुख्याने माथाडी, हमाल,डब्बेवाले,घरघडी,गोदीकामगार आदी साररीक कष्ट करणारे आहेत.सर्वेक्षणानुसार मराठा समाजातील शिक्षणाचे प्रमाण अशिक्षित १३.४२ टक्के, प्राथमिक शिक्षण ३५.३१ टक्के, दहावी ४३.७९ टक्के एवढे आहे. या सर्वेक्षणानुसार मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे पुढे आले आहे.दारिद्र्य रेषेखालील मराठा समाजाचा विचार केल्यास ७२.८२ टक्के मराठा कुटुंबांचे उत्पन्न् गतवर्षी सरासरी ५० हजारा पेक्षा कमी होते.या पार्श्वभूमीवर ३७.२८ टक्के लोक द्रारिद्र्य रेषेखालील आहेत.
शासकीय व निमशासकीय नोक-यांमध्ये ६ टक्के मराठा समाज आहे तर ड वर्गामध्ये त्याचे जास्त प्रमाण असल्याचे या अहवालात म्हटले आहे.भारतीय पोलीस सेवेतील प्रमाण १५.९२ टक्के तर वन सेवेत ७.८७ टक्के प्रमाण आहे. भारतीय प्रशासन सेवेत ६.९२ टक्के तर थेट भरतीमध्ये हे प्रमाण केवळ ०.२७ टक्के आहे. मराठा लोकसंख्येंच्या तुलनेत केवळ ४.३० टक्के उच्च शिक्षित आहेत. इतर पदवी अभ्यासक्रमात हे अत्यल्प प्रमाण हे सामाजिक अक्षमता आर्थिक असमर्थता व शैक्षणिक दुर्बल असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होते.मराठा समाजाच्या ४९ टक्के कुटुंबांकडे कोणतेही वाहन नसून, ४७ टक्के कुटुंबाकडे दुचाकी तर ०.५३ टक्के कुटुंबाकडे चार चाकी वाहन असल्याचे म्हटले आहे.मराठा समाजात ७८ टक्के कुटुंबे भूमिहीन आणि सीमांत भूधारक शेतकरी असून, २.७ टक्के शेतक-यांकडे १० एकर पर्यंत जमीन असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. वरील अहवालातील निष्कर्ष विचारात घेता मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होत असल्याचे मागासर्व आयोगाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.