श्रेयवादात सर्वच पक्ष आघाडीवर ;शिवसेनेची पोस्टरबाजी

श्रेयवादात सर्वच पक्ष आघाडीवर ;शिवसेनेची पोस्टरबाजी

मुंबई:मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात एकमतानं मंजूर झाल्यावर श्रेयवादाची जोरदार लढाई सुरु झाली आहे. यात सर्वच पक्ष सरसावले आहेत.विधेयक मंजूर होताच भाजप शिवसेना आमदारांनी सभागृहाबाहेर येऊन फेटे बांधून जल्लोष केला. तर शिवसेनेने पोस्टरबाजी केली आहे.

मराठा समाजासाठी सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने सरकारकडे मागण्या केल्या. त्यामुळेच आरक्षण सुकर झालं, असं शिवसेनेनं लावलेल्या पोस्टरवर म्हटलं आहे. विधानसभेतील विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगेच ट्विट करुन हे आरक्षण आम्ही दिलेलंच आहे, असं सांगितलं आहे. आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी नेत्यांची रांगच लागली. प्रथम अजित पवार आणि जयंत पाटील गेले. नंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे गेले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर स्पष्टपणेच आरक्षणाचे श्रेय भाजपचं असल्याचं सांगितलं. हे आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी तज्ञ वकिलांची फौज उभी करु, असंही दानवे यांनी सांगितलं.

Previous articleसामाजिक प्रश्नाबाबत महाराष्ट्र एकत्र येतो हे पुन्हा सिद्ध : मुख्यमंत्री
Next article………हा माझाच विजय :नारायण राणे