विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई : विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे  ज्येष्ठ सदस्य विजय औटी यांची आज बिनविरोध निवड झाली काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष सदस्य बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळॆ औटी यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.या निवडीमुळे ४ वर्षांनंतर विधानसभेला उपाध्यक्ष लाभले आहे.

उपाध्यक्षपदपदासाठी विधानसभा अध्यक्षांनी २८ नोव्हेंबरला निवडणूक घोषित केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून विजय औटी, काँग्रेसकडून हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्ज दाखल केले होते. संख्याबळ पाहता औटी यांची निवड निश्‍चित होती; मात्र प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज  मागे घेतल्यामुळे औटी यांची बिनविरोध निवड झाल्याची  घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी  केली.

आपण ईश्वरी कृपेने इथवर आलो. राजकारणात पक्ष वेगळे असले तरी सर्वांशी व्यक्तीगत संबंध जपले, स्नेह त्यामुळे वाढत गेला. आपली निवड एकमताने केल्याबदद्ल सर्वांचे आभार. सभागृहाची प्रतिष्ठा वाढेल असेच आुपण काम करू, सर्वांना समान न्याय देण्याची आपली भुमिका राहील असे यावेळी औटी म्हणाले,

विजय औटी हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर सलग तीन वेळा  निवडून आले.त्यांचे वडील भास्करराव औटी याच मतदारसंघात दोन वेळा आमदार होते. कला शाखेचे पदवीधर असलेल्या औटी यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. १९८५ मध्ये त्यांनी प्रथम काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. तालुक्यात सेनापती बापट पतसंस्थेची स्थापना केली. जिल्हा परिषद राजकारणातही ते आणि त्यांच्या पत्नी सक्रिय राहिल्या. २००४ मध्ये औटी यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आणि निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या.

Previous article………हा माझाच विजय :नारायण राणे
Next articleमराठा आरक्षण आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु