राष्ट्रवादीत जाण्याच्या वावड्याच : नारायण राणे यांचा खुलासा

राष्ट्रवादीत जाण्याच्या वावड्याच : नारायण राणे यांचा खुलासा

सावंतवाडी: कॉंग्रेसचा त्याग केलेला कोकणातील एक दिग्गज नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी माध्यमांनी दिल्या होत्या. त्या बातम्यांचा रोख माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडेच होता. पण आज सावंतवाडीत पत्रकार परिषदेत खुद्द राणे यांनी त्या बातम्या म्हणजे केवळ वावड्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.

राणे म्हणाले की, मी राष्ट्रवादीच्या कोणाही नेत्याला भेटलो नाही. कोणाशी चर्चा केली नाही. तरीही माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वावड्या कशा उठल्या, याचं मलाच आश्चर्य वाटतं. राष्ट्रवादीशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.राणे राष्ट्रवादीशी जवळीक साधू पाहत असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर राणे म्हणाले की, माझा राष्ट्रवैदीशी काही संबंध नाही. माझ्याशी कोणी बोललेही नाही. अशी चर्चा होणे योग्य नाही. त्यांची बैठक झाली आणि त्यात राणे देतील तो उमेदवार लोकसभा मतदारसंघासाठी मान्य करावा, अशी चर्चा झाली. त्याबाबत मला नक्की माहीत नाही. पण अशा बातम्या प्रसिद्ध होणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

आमदार नितेश राणे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांवर प्रदेश कॉंग्रेसचे लक्ष आहे, असा इशारा देण्यात आला होता. हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी, असे आव्हान राणे यांनी दिले.
राणे यांच्या राष्ट्रवादीशी होत असलेल्या जवळीकीच्या बातम्यांच्या मागे भाजप शिवसेना युतीच्या शक्यतेची पार्श्वभूमी होती. युती झाली तर कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार, हे उघड आहे. राणेंना मग काहीच संधी नाही. शिवाय राणेंच्या बहाण्याने राष्ट्रवादीचा या जागेवर दावा सांगण्याचा इरादा होता.

Previous articleसरकारची कथनी एक आणि करणी वेगळी : भुजबळ
Next articleभाजप हीच खरी ‘गॅंग ऑफ वासेपूर’ : विखे पाटलांचा  सरकारवर हल्लाबोल