गुड न्यूज : १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार

 १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या १ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाईल अशी माहिती अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेमध्ये दिली आहे.

विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी घोषणा केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा आयोग लागू करण्यात आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांनी करून संपाचे हत्यारही उपसले होते. यासाठी गठीत करण्यात के.पी .बक्षी समितीचा अहवाल येत्या ५ डिसेंबरला सरकारला सादर करण्यात येणार असून, बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकारून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. हा अहवाल येण्यास उशीर झाला तरी येत्या १ जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन अर्थ राज्यमंत्री केसरकर यांनी दिले.

Previous articleआनंदाची बातमी : मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी
Next articleराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात काय बोलणार?