नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास लालकृष्ण आडवाणींचा विरोध :केतकर

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास लालकृष्ण आडवाणींचा विरोध :केतकर

पुणे: पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी यावे, हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. मोदींनी पंतप्रधान होण्यास खुद्द लालकृष्ण आडवाणी यांचाच विरोध होता, असा खळबळजनक आरोप कॉंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी आज एका कार्यक्रमात केला.

केतकर म्हणाले की, मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड करण्यासाठी गोव्यात भाजपची बैठक झाली. त्यात पक्षाध्यक्षपदी नितीन गडकरी यांच्याजागी ऐनवेळी राजनाथ सिंह यांची निवड झाली. त्यावेळी आम्ही राजनाथ सिंह यांनी प्रश्न केला की, संसदीय नेतेपदी अचानक मोदी यांचे नाव कसे आले? ते म्हणाले की, मोदींची निवड केली नसती तर तेथेच जातीय दंगल पेटली असती. मोदी यांना लालकृष्ण आडवाणी यांचा विरोध असल्याने ते उपस्थित राहिले नाहीत. सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा लवकर निघून गेले.

२०१९ मध्ये सत्तांतर सहज शक्य नाही, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. सीबीआयसारख्या अनेक संस्था मोदी सरकारच्या ताब्यात आहेत. त्यामुळे भाजपला हरवणे सोपे नाही, असे केतकर म्हणाले.

केतकर यांच्या या वक्तव्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. भाजप प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले की, केतकर म्हणतात की ३० वर्षापूर्वी मोदी यांना पंतप्रधान करण्याचा कट रचला गेला. तेव्हा तर मोदी राजकारणातही नव्हते.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केतकर यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले. न्यायव्यवस्था, संसदेत सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचे पवार म्हणाले.
कुमार केतकर यांच्या वक्तव्यावर आता आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे.

Previous articleआम्हाला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी :अशोक चव्हाण
Next articleभाजप हा देशाला जडलेला कॅन्सरः खा. अशोक चव्हाण