बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करणार :मुख्यमंत्री

बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करणार :मुख्यमंत्री

मुंबई:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच राज्याची वाटचाल सुरू आहे. बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, बाबासाहेबांनी पाहिलेले समतेचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आदी अनेक दिग्गजांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भीमज्योतीचे भूमीपूजन केले जाणार होते. परंतु रिपब्लिकन सेनेने केलेल्या विरोधामुळे हा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला.चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासांठी भीमसागर उसळला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली आहे. यात ते म्हणतात की, भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव, क्रांतिसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. बाबासाहेबांचे विचार हा आपला अमूल्य असा ठेवा आहे. आजही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात त्यांचे विचार आजही पथदर्शी आहेत.

Previous articleमेगा भरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण: शासन निर्णय जारी
Next articleराज ठाकरे यांना आपल्याकडे खेचण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न