चारा छावण्या नसतील तर जनावरांना पाहुण्यांकडे पाठवा : राम शिंदे

चारा छावण्या नसतील तर जनावरांना पाहुण्यांकडे पाठवा : राम शिंदे

अहमदनगर:जनावरांसाठी चारा छावण्या नसतील तर जनावरे पाहुण्यांकडे द्या धाडून, असे वादग्रस्त विधान राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी आज केले. यावर बराच गदारोळ माजल्यावर स्वत: शिंदे यांनीच नंतर शेतकऱ्यांना दुखवायचा माझा हेतू नव्हता, असा खुलासा केला.

अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मंत्री शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांना छावण्यांच्या मागणीवर चारा छावण्या नसतील तर जनावरे पाहुण्यांकडे पाठवा, असे अजब उत्तर दिले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गदारोळ झाला. राज्य दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना मंत्र्यांच्या या विधानामुळे संताप निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाथर्डी तालुक्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिंदे आले असताना हा प्रकार घडला. पालकमंत्री दुष्काळासारख्या प्रश्नावरही विनोद करत आहेत, अशी चर्चा रंगली होती.

मात्र पालकमंत्री शिंदे यांनी तातडीने खुलासा करताना जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले.

Previous articleचालक, वाहकसह शिपाई यांना आता लिपिक पदावर पदोन्नतीसाठी २५ टक्के आरक्षण
Next articleराम शिंदे यांचे शेतकरी विरोधी वक्तव्य हीच सरकारची खरी मानसिकता : मुंडे