ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत केले महामानवाला अभिवादन

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत केले महामानवाला अभिवादन

परळी : राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री  पंकजा मुंडे यांनी आज ६ डिसेंबर रोजी परळी येथे महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

पंकजा मुंडे या तेलंगणा निवडणूकीचा प्रचार दौरा आटोपून काल संध्याकाळी परळी येथे आल्या होत्या. डाॅ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी त्या चैत्यभूमीला जात असतात. परंतू प्रचारात असल्याने त्या परळीत आल्या होत्या. आपल्या धावपळीच्या या दौऱ्यात परळी येथे त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजप शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, उमेश खाडे, नितीन ढाकणे,  रमेश गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

धारूर तालुक्यातील खामगांवचा परळी तालुक्यात समावेश करून गेल्या २५ वर्षापासूनचा प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामस्थांनी आज  पंकजा मुंडे यांचा निवासस्थानी सत्कार करून आभार मानले. खामगांवचे सरपंच श्रीराम बडे, पोलिस पाटील श्रीधर बडे, उप सरपंच देविदास घडवे, पी.के. बडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. परळी तालुक्यातील गावांना भरभरून विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मतदारसंघातील विविध सरपंचानी देखील यावेळी त्यांचा सत्कार केला.

Previous articleराज ठाकरे माझीच कॉपी करत करतात : प्रकाश आंबेडकर
Next articleभाजपच्या नेत्यांची सत्तेची मस्ती जनताच उतरवेलः खा. अशोक चव्हाण