डिजीटल प्रचारात धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांपेक्षा आघाडीवर

डिजीटल प्रचारात धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांपेक्षा आघाडीवर

मुंबई : सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. पण, या निवडणुकीनिमित्त एक वेगळी लढाई समोर आली आहे ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांत ऑनलाईन बाबतीत सरस कोण? सध्यातरी यात धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे.

त्याचे झाले असे, ६ डिसेंबरला धुळ्यात महानगर पालिका निवडणूक प्रचार शिगेला पोहचला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे जोरदार सभा घेत होते. नेमके त्याचवेळेस भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा धुळ्यातच सभा घेत होते. दोघांच्याही सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पण, खरी गंमत पुढे आहे. दोघांच्याही सभा त्यांच्या त्यांच्या सोशल मीडिया टीमने फेसबुकवर लाईव्ह केल्या. आता सभा होऊन १५ तास झालेत. ७ डिसेंबरला सकाळी १० वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांचा सभेचा व्हिडीओ जवळपास ४२ हजार लोकांनी बघितला आहे तर देवेंद्र फडणवीस यांना जेमतेम ३८ हजारांचा आकडा गाठता आला आहे.

विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या बाबतीत सध्यातरी सर्वात पुढे असते. त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजला तब्बल ८५ लाख लाईक्स आहेत तर धनंजय मुंडेंना पावणे चार लाख लाईक्स आहेत. थोडक्यात आपल्या एकूण अनुसारकांपैकी (फॉलोवर्स) केवळ ०.४५ टक्के लोकांनी देवेंद्र यांचे भाषण बघितले तर धनंजय मुंडेंचे भाषण तब्बल ११ टक्के लोंकांनी बघितले आहेत. याचाच अर्थ धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांपेक्षा २४ पटींनी पुढे आहेत. त्यामुळे तुर्तास तरी डिजीटल प्रचारात धनंजय मुंडेंनी दिला देवेंद्र फडणवीसांना धोबीपछाड दिला आहे. आज पुन्हा दोघेही अहमदनगरमध्ये एकाच वेळी आमनेसामने येणार आहेत तेव्हा सगळ्यांचे लक्ष असेल या दोन नेत्यांत कोणकोणाला भारी पडणार?

Previous articleसरकारला प्रशासनाकडून काम करूनच घेता येत नाही : अजित पवार
Next articleमुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करणार !