शरद पवारांनी असा पुरवला नातीचा हट्ट

शरद पवारांनी असा पुरवला नातीचा हट्ट

मुंबई :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नातीचा म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीचा एक हट्ट पुरवला.

मुंबईतील प्रदेश कार्यालयातील एका कार्यक्रम आटोपून शरद पवार जेव्हा कार्यालयाच्या बाहेर पडले तेव्हा त्यांना घेण्यासाठी त्यांची नात रेवती म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती होंडा सिटी गाडी घेवून उभी होती. आपली नात घ्यायला आली म्हटल्यावर शरद पवार गाडीत बसले.शरद पवार याच्यासह,खा. सुप्रिया सुळे यांना रेवतीने सिल्वर ओक निवासस्थानी सोडले. अशा प्रकारे पवारांनी त्यांच्या नातीचा हट्ट पुरवला.

शरद पवार हे नेहमी आपल्या टोयोटा लॅन्ड क्रुझर या गाडीने प्रवास करतात. मात्र आपल्या नातीच्या हट्टापुढे त्यांचे काहीही चालले नाही. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी आपल्या नातवंडांसह कोकण दौरा केला. सुप्रिया सुळेंची कन्या रेवती म्हणजेच शरद पवारांच्या नातीने केलेला आग्रह त्यांना मोडता आला नाही.

Previous articleविकासात नाशिकची झालेली पीछेहाट ही चिंतेची बाब- छगन भुजबळ
Next articleभीम आर्मीला पुण्यात सभेची परवानगी देऊ नका:मिलिंद एकबोटे