भीम आर्मीला पुण्यात सभेची परवानगी देऊ नका:मिलिंद एकबोटे

भीम आर्मीला पुण्यात सभेची परवानगी देऊ नका:मिलिंद एकबोटे

पुणे:भीमा कोरेगाव प्रकरणी राज्यात पुन्हा वातावरण पेटत चालले आहे. भीम आर्मीला पुण्यात सभेला परवानगी देऊ नका, अशी मागणी करणारे पत्र हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी भीमा कोरेगाव दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगाला पाठवले आहे. ३० डिसेंबरला भीम आर्मीने पुण्यात सभा घेण्याचे ठरवले असून आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हजेरी लावणार आहे.

गेल्या वेळेस एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगावात दंगल पेटून सारा महाराष्ट्र होरपळला होता. एकबोटे यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या वेळेस एल्गार परिषदेमुळे दंगल भडकली होती. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीच्या सभेला परवानगी देऊ नये. त्यात जातीय गरळ ओकले जाण्याची शक्यता आहे.

भीम आर्मीचे प्रमुख अशोक कांबळे यांनी म्हटले आहे की, आझाद २८ डिसेंबरला महाराष्ट्रात येणार असून मुंबई, पुणे आणि लातूर, अमरावती येथे त्यांचा कार्यक्रम होईल. भीमा कोरेगाव येथे ते संविधान वाचवण्याचे आवाहन करणार आहेत.गेल्या वेळेस भीमा कोरेगाव प्रकरणी दंगल होऊन एकाचा बळी गेला होता. महाराष्ट्राला तिच्या झळा बसल्या होत्या आणि राजकीय वातावरणही कमालीचे पेटले होते. एकबोटे यांच्यावरही दंगल भडकवल्याचा आरोप आहे.

Previous articleशरद पवारांनी असा पुरवला नातीचा हट्ट
Next articleगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवास हत्येप्रकरणात अटक