गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवास हत्येप्रकरणात अटक

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवास हत्येप्रकरणात अटक

मुंबई: घाटकोपरमधील ज्वेलर राजेश्वर उदानी यांच्या हत्ये प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव आणि निकटवर्ती सचिन पवार याला पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे

मेहता यांच्याशी पवार याचा निकटवर्ती संबंध होता. तो काही काळ मेहतांचा स्वीय सचिवही होता. मात्र काही काळापासून मेहता आणि पवार यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. मात्र पवार हा मेहता यांच्याबरोबर अनेक वर्षांपासून काम करत होता. पवारच्या पत्नीनेही भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली होती.

सचिन पवार हा घाटकोपर भाजपमधील बडे प्रस्थ समजला जातो. भाजपमधील अनेक नेत्यांमध्ये त्याचा वावर होता, असे सांगण्यात येते. आता हत्या प्रकरणात अप्रत्यक्ष रित्या मेहता यांचेच नाव आल्याने या प्रकरणी राजकीय रंग मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान मेहता यांनी पवार आपला सचिव होता, हे मान्य केले आहे. मात्र २०१० नंतर त्याच्याशी आपला संबंध नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यापाऱ्याच्याहत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून प्रकाश मेहता यांच्या माजी मुख्य सचिवाचे नाव आल्याने विरोधक या प्रकरणी रान उठवणार हे स्पष्टच आहे. या निमित्ताने विरोधी पक्ष मेहता यांना घेरण्याची शक्यता आहे.

Previous articleभीम आर्मीला पुण्यात सभेची परवानगी देऊ नका:मिलिंद एकबोटे
Next articleम्हाडाच्या घरांच्या लाॅटरीची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक : उदय सामंत