म्हाडाच्या घरांच्या लाॅटरीची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक : उदय सामंत

म्हाडाच्या घरांच्या लाॅटरीची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक : उदय सामंत

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ सदनिकांची लॉटरी येत्या १६ डिसेंबरला होणार आहे. याची पूर्ण तय्यारी झाली आहे. हि लॉटरी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असून संगणकाच्या मार्फत होणार आहे. या मध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होणार नाही. त्यामुळे दलालांच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ सदनिकांची लॉटरी येत्या १६ डिसेंबरला होणार आहे. १ हजार ३८४ घरांसाठी १ लाख ३२ हजार ७०० अर्ज आले असून, लाॅटरीची तयारी पूर्ण झाली असून,हि लॉटरी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असून संगणकाच्या मार्फत होणार आहे. या मध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होणार नाही. त्यामुळे दलालांच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले आहे.

एकाच अर्जाच्या अनामत रकमेवर चार अर्ज करणे, सर्वच उत्पन्न गटातील घरांसाठी समान नियम लागू करणे, प्रत्येक अर्जासोबत अनामत रकमेसह स्वतंत्र शुल्क भरून अनेक अर्ज करण्याची मुभा देणे असे प्रस्ताव विचाराधीन असून, अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी धोरण आखणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लॉटरीची संगणकाकीय प्रक्रिया कशी चालते, ती कशी पारदर्शक आहे. लॉटरीच्या वेळी नेमके काय होते, याचे प्रात्यक्षिके यावेळी दाखवण्यात आले. लॉटरीची प्रक्रिया पारदर्शक असावी म्हणून नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष लॉटरी सुरु करण्यापासून ते लॉटरी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व प्रक्रियेत नागरिकांना सहभागी करण्यात येणार आहे. लॉटरीचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. लॉटरी काढण्यासाठी १५ नागरीकामधून तिघांना निवडून लॉटरीची प्रक्रियेच पूर्ण करणार आहे. या वेळच्या लॉटरीसाठी अनेक नवीन बदल घडवण्यात आले आहेत. असे सामंत यांनी सांगितले. तुम्हाला कुणीही म्हाडाचे घर मिळून देऊ शकत नाही, लॉटरी मार्फतच घर मिळणार. दलालांची मदत घेऊ नका, दलालांना बळी पडू नका, कुणाकडून फसवणूक करून घेऊ नका. केवळ ऑनलाईन अर्ज करून पारदर्शक लॉटरी मार्फतच नागरिकाना घरे मिळणार असे आवाहन सामंत यांनी नागरिकांना केले आहेत.

Previous articleगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवास हत्येप्रकरणात अटक
Next articleसहा महिन्यात काँग्रेसचे सरकार, जनतेला दिलासा मिळणारः खा. चव्हाण