प्रविण गोसावीने का केली रामदास आठवलेंना धक्काबुक्की ?

प्रविण गोसावीने का केली रामदास आठवलेंना धक्काबुक्की ?

अंबरनाथ:  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये काल रात्री एका कार्यक्रमादरम्यान प्रविण गोसावी या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यानेच मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करीत असल्याच्या रागातूनच प्रविण गोसावीने कालचा हल्ला केल्याची प्राथमिक  अंदाज वर्तवला जात आहे.

काल रात्री अंबरनाथ पश्चिममध्ये विको नाका परिसरात नेताजी मैदानात संविधान दिनानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलै होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामदास आठवले होते. त्या सभेला प्रवीण गोसावी हजर होता. मात्र रामदास आठवले यांच्याबद्दल त्याला पूर्वीपासून राग होता.
कार्यक्रम संपल्यानंतर आठवले स्टेजवरून खाली उतरताना त्यांना प्रविणने धक्काबुक्की केली. काही कळायच्या आतच आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविणला पकडून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून ,त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आठवले हे वैयक्तिक स्वार्थासाठी आंबेडकरी जनतेचा वापर करत असल्याच्या रागातूनच प्रविण गोसावीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. प्रविणने रामदास आठवलेंविरोधात समाज माध्यमांतून टीका करीत होता. प्रविण हा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असून तो काही काळ आरपीआयचा सक्रीय कार्यकर्ता होता, अशीही माहिती समजते.

Previous articleकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की
Next articleपुरेसा पोलीस बंदोबस्त असता तर कालची घटना टळली असती : आठवले