धुळ्यात ६०, तर अहमदनगरमध्ये ६७ टक्के मतदान

धुळ्यात ६०, तर अहमदनगरमध्ये ६७ टक्के मतदान

मुंबई : धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुक्रमे सरासरी ६० आणि ६७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

धुळे महानगरपालिकेच्या १९ प्रभागातील एकूण ७३ जागांसाठी हे मतदान झाले. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण ७४ जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव होत्या. अहमदनगर महानगरपालिकेच्या १७  प्रभागातील एकूण ६८ जागांसाठी मतदान झाले. अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत. मतमोजणी उद्या सोमवारी १०  रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

राज्यातील विविध सहा नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ७४.१२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सहापैकी मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. सर्व ठिकाणी आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. मतमोजणी उद्या (ता. १०) रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
नगरपरिषद,नगरपंचायत निहाय सरासरी मतदान: नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ)- ७३.१५, लोहा (नांदेड)- ८६.७५, मौदा (नागपूर)- ७७.५६, रिसोड (वाशीम)- ६८.०७, ब्रम्हपुरी (चंद्रपूर)- ७०.५२, आणि शेंदुर्णी (जळगाव)- ७४.१९, एकूण सरासरी- ७४.१२

 

 

 

Previous articleपुरेसा पोलीस बंदोबस्त असता तर कालची घटना टळली असती : आठवले
Next articleवा… ग्रेट… शिवतारे साहेब….लाजवाब !