वा… ग्रेट… शिवतारे साहेब….लाजवाब !

वा… ग्रेट… शिवतारे साहेब….लाजवाब !

पुणे : जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अद्ययावत आणि देखण्या इमारतीचे उदघाटन आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले रुग्णालयाची इमारत आणि येथील सुविधा पाहून खुश झालेल्या आरोग्यमंत्र्यांनी वा, ग्रेट,….शिवतारे साहेब….    लाजवाब अशा शब्दात राज्यमंत्री विजय शिवतारे आणि आरोग्य तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

पुरंदर पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शालिनीताई पवार, ज्योती झेंडे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, नलिनी लोळे, गोरखनाथ माने, नियोजन मंडळाचे सदस्य गिरीश जगताप, भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, भाजप शहराध्यक्ष अशोक खोमणे, सेनेचे शहरप्रमुख किरण दावलकर, महेश स्वामी, माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर, उपशहरप्रमुख रवींद्र निंबाळकर, सासवडचे नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, माजी नगरसेवक राजेंद्र दळवी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. हॉस्पिटलला जागा देणाऱ्या माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांचे आरोग्यमंत्री सावंत व राज्यमंत्री शिवतारे दोघांनीही आभार मानले.

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यमंत्री शिवतारे यांच्या माध्यमातून उभे राहिलेले अप्रतिम काम खाजगी रुग्णालयालाही लाजवेल अशा स्वरूपाचे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोणाचेही या कामासाठी साधे पत्रही मला आले नाही. सत्ता नसल्यामुळे त्यांना कुठेच नारळ फोडायला मिळत नाही.  श्रेयासाठी अंधारात नारळ फोडायचे काम ही मंडळी करतात. हे रुग्णालय म्हणजे केवळ भिंती नव्हेत. सर्व सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय पुरंदर तालुक्याच्या सर्व सामान्यांच्या सेवेसाठी आज खुले होत आहे.  शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आणि आयुष्यमान भारत योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही सावंत यांनी केले.

यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर चौफेर हल्ला चढवला. शिवतारे म्हणाले, खासदार सुळे सेल्फी काढत फिरतात पण आज एवढ्या मोठ्या कामाच्या सेल्फीसाठी निमंत्रण देऊनही त्या आल्या नाहीत. पुरंदर तालुक्यात हडपसर सासवड जेजुरी मार्ग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गावोगावी रस्त्यांची कामे, जलसंधारणाची कामे, क्रीडासंकुल, धान्य गोदाम, आरटीओ अशी असंख्य कामे झालेली आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रगतीपथावर आहे. बारामती घडवायला पवार कुटुंबाची ५० वर्ष गेली. पुरंदर हवेली त्या रस्त्यावर अवघ्या नऊ वर्षात आला. येत्या दोन-चार वर्षात तालुका बारामतीलही मागे पाडेल अशा स्थितीत आहे. नेमकी हीच पोटदुखी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. लवकरच येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याचेही प्रयत्न आहेत असेही शिवतारे म्हणाले.

Previous articleधुळ्यात ६०, तर अहमदनगरमध्ये ६७ टक्के मतदान
Next articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असाही एक विक्रम !