मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असाही एक विक्रम !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असाही एक विक्रम !

मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिले असून,राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर सर्वाधिक काळ राहणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मोडला आहे.

२०१४ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नियोजनबध्द प्रचारामुळे खुश झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची धुरा नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे ऐवजी देवेंद्र फडणवीसांकडे सोपविल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते आपला पाच वर्षाचा कालावधी सहज पूर्ण करतील याची खात्री कोणालाच नव्हती.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता राज्यात एकही मुख्यमंत्री पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही.

विधानसभा निवडणूकीत शिवसेनेशी घेतलेला पंगा,राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर न मागता राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा यामुळे फडणवीस आपला कार्यकाल पूर्ण करतील या बद्दल शंका होती. एवढेच नाही तर स्वपक्षातील एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांचे समोर मोठे आव्हान होते. विधानपरिषद सदस्य चंद्रकांत पाटलांवर तर थेट दिल्लीश्वराचे वरदहस्त असल्याने फडणवीस हि आव्हान सहज पेलतील असे वाटले नव्हते.परंतु गेल्या सव्वा चार वर्षात केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशीच परिस्थिती आहे. शेतक-यांचे उपोषण, मराठा मोर्चामुळे फडणवीसांची खुर्ची जाणार असे फडणवीस विरोधक खुल्लमखुल्ला बोलत होते मात्र मुख्यमंत्र्यांनी हे विषय योग्य पध्दतीने हाताळल्याने दिल्लीश्वर फडणवीसांवर भारीच प्रसन्न असल्याने अबकी बार देवेंद्रभाऊ असाच नारा असणार आहे

Previous articleवा… ग्रेट… शिवतारे साहेब….लाजवाब !
Next articleसीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी धनंजय मुंडे आज बेळगांव मध्ये