कोल्हापूर महापौरपदी राष्ट्रवादीच्या सरिता मोरे
कोल्हापूर: जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापौरपद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरिता मोरे या विजयी झाल्या. भाजप ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा त्यांनी ४१ विरूद्ध ३३ मतांनी पराभव केला. शिवसेनेचे चार सदस्य असून शिवसेना मात्र निवडणुकीत ऐनवेळी तटस्थ राहिले.
ही निवडणूक यासाठी गाजली होती की, कोल्हापूर महापाालिकेत महापौर निवडणुकीनंतर जोरदार राजकारण सुरू झाले होते. शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली. गेल्या वेळेस शिवसेनेने येथे कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता.भाजपने यंदा तुल्यबळ उमेदवार दिल्याने कोणत्या क्षणी काहीही घडेल, असे वाटत असल्याने आघाडीच्या तंबूत घबराट माजली होती. स्थायू समिती सभापती निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीने दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले. त्यांना निवडणुकीत मतदान करता आले नाही.
पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश आणण्यासाठी भाजपतर्फे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु आज शेवटपर्यंत अपात्रतेचा आदेश आलाच नाही.सरिता मोरे यांच्या विजयानंतर कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.महापौर निवडणुकीच्या वेळेस काही नाट्यपूर्ण घटना घडली. नगरसेवकांना ओळखपत्र दाखवून आत सोडण्यात येत होते. यावर हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची दादागिरी सुरू असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. पोलिस आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये बाचाबाचीही झाली.