समजदार को इशारा काफी है : संजय राऊत

समजदार को इशारा काफी है : संजय राऊत

मुंबई:पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांची दिशा स्पष्ट झाली असून राजस्थान, छत्तीसगढ ही राज्ये भाजपच्या हातून निसटणार असल्याचे स्पष्ट झाले. तर मध्यप्रदेशात अटीतटीची लढत आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी समजदार को इशारा काफी है असे म्हटले आहे. तसेच भाजपला त्यांनी आत्मचिंतनाचा सल्लाही दिला आहे.

पाच राज्यांमध्ये भाजपला हादरा बसला आहे. तेलंगणात भाजपची ताकद नसल्यामुळे तेथे भाजपला आशाच नव्हती. परंतु छत्तीसगढ हा भाजपसाठी धक्का आहे. या निकालातून स्पष्ट संदेश मिळत आहे, असे राऊत म्हणाले. कुणासाठी स्पष्ट संदेश असे विचारल्यावर त्यांनी समजदार को इशारा काफी है असे सूचक वक्तव्य केले.

संजय राऊत म्हणाले की, हा विजय कॉंग्रेसचा आहे असे मी म्हणणार नाही. पण मोदी यांनी आत्मपरीक्षण करण्याची निश्चितच गरज आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शिवसेना सरकारवर सातत्याने टीका करत आहे. विरोधी पक्षांचीही जागा व्यापण्याचा सेनेचा इरादा आहे. यामुळेच भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने सेनेच्या या इशाऱ्याचे अनेक अर्थ आहेत. यापुढे सेना स्वबळावर लढण्यासाठी जोर लावू शकते किंवा भाजपपुढे युतीसाठी आणखी कडक अटी घालू शकते.मोदी सरकारने या निकालांवरून आत्मचिंतन केले पाहिजे, असेही वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

Previous articleमहसूल विभागातील २३० पदांसह ३४२ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध
Next articleधनंजय मुंडेंच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा दाखल