पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नोकरी मिळणार

पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नोकरी मिळणार

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय ( संक्षिप्त ) पुढील प्रमाणे आहेत.

१. राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय.

२. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय.

३. पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना सूचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारसींना मान्यता.

४. महिला शक्ती केंद्र योजनेंतर्गत राज्यस्तरीय माहिती केंद्रासह २६ जिल्हास्तरीय समित्या तसेच आकांक्षित चार जिल्ह्यांत तालुकास्तरीय समित्या सुरु करण्यास मान्यता.

५. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्याच्या निर्णयात सुधारणा. अनिवार्य खर्चासाठी प्रतिवर्ष १० कोटी एवढा निधी सहायक अनुदान म्हणून १० वर्षासाठी मिळणार.

६. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत २६ बांधकामाधीन प्रकल्पांसाठी वाढीव कर्जासह लाभक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत २२ प्रकल्प अशा एकूण ४८ प्रकल्पांसाठी नाबार्डकडून एकूण ६९८५ कोटी रुपये कर्ज घेण्यास मान्यता.

७. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे नरडवे येथील नरडवे मध्यम प्रकल्पास १०८५ कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता.

८. कृषि विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी कुलगुरु शोध समितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक किंवा त्यांच्या ऐवजी त्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा समावेश.

९. गोंदिया एज्यूकेशन सोसायटीच्या भंडारा येथील जे.एन. पटेल महाविद्यालयातील संगणकशास्त्र या विषयास अनुदान मंजूर.

Previous article२०१९ मध्ये हाच कल राहील :पृथ्वीराज चव्हाण यांचे भाकित
Next articleसरकारचा मोठा निर्णय : अशी मिळेल पदवीधरांना कंत्राटी नोकरी